आईएफ़बी मध्ये साजरा केला रस्ते सुरक्षा अभियान २०२५

Dhak Lekhanicha
0

 आईएफ़बी मध्ये साजरा केला रस्ते सुरक्षा अभियान २०२५


शिरूर प्रतिनिधी -आईएफबी रेफ्रिजरेशन लिमिटेड रांजणगाव फेज ३ पुणे कंपनीने पोलिस स्टेशन,शिरूर व महामार्ग पोलीस पथक शिक्रापुर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा अभियान साजरा केला, या अभियान अंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले.


शिरूर  पोलीस  स्टेशन  चे  पोलीस  इन्स्पेक्टर  श्री  संदेश  केंजळे  साहेबांनी  व श्री  राजेंद्र  पवार  सहायक पोलिस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक यांनी  कंपनीतील अधिकारी वर्गाला रस्ता  सुरक्षा  विषयी  प्रशिक्षण दिले , कंपनीचे  प्लांट हेड श्री वेंकटा मडाला,प्रोडक्शन हेड अविनाश हमदापुरकर व मानव संसाधन प्रमुख  श्री काशीराम  मेस्त्री  सरांनी  रस्ता  सुरक्षा  मोहीम  राबवण्यासाठी  प्रोत्साहन  दिले.


कंपनीचे  अधिकारी  वर्ग, महामार्ग सुरक्षा पथक चे व  शिरूर  ट्रॅफिक  पोलीस कर्मचारी यांनी  न्हावरे  फाटा, शिरूर  येथे  सामान्य नागरिका साठी रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती केली , या कार्यक्रमासाठी श्री  राजेंद्र  पवार  सहायक पोलिस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, आयएफबी चे सेफ्टी  मॅनेजर  श्री  संतोष  निंबाळकर, सचिन  कर्डीले  व योगेश  मोरे व काही अधिकारी उपस्थित होते,यांनी सर्व सहभागींना रहदारी नियमांचे पालन करण्याचे आणि सुरक्षितपणे वाहन चालविण्याचे आवाहन केले. 


तसेच कंपनी ने महामार्ग सुरक्षा पथक व पुणे ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले.याचे उद्घाटनासाठी श्री विक्रांत देशमुख पोलीस अधीक्षक व श्री राजेंद्र पवार सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस उपस्थित होते, रक्तदान शिबिराला कंपनी मधल्या अधिकारी व कामगार वर्गानी खूप चांगला प्रतिसाद दिला व शिबिरामध्ये रक्तदानाची शंभरी पार करत शिबिर यशस्वी पार पाड़ले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!