शिरूर मधील तहसील कार्यालय आवारातील आमरण उपोषण अखेर मागे..

Dhak Lekhanicha
0

 शिरूर मधील तहसील कार्यालय आवारातील आमरण उपोषण अखेर मागे..


शिरूर (सुदर्शन दरेकर)-संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील मागील सहा दिवस अत्यंत टोकाचा संघर्ष करत होते. त्यांच्यासोबत शेकडो मराठा सेवकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती.अशातच २९ जानेवारीच्या सकाळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाबाबत सकारात्मक आहात किंवा नाही याबाबतची भूमिका जाहीर करण्याची संध्याकाळ पर्यंतची वेळ प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना दिली होती.नाहीतर मी आपली भूमिका जाहीर करतो. त्यांना संध्याकाळपर्यंत सरकार मार्फत कोणत्याही प्रकारचा संदेश मेसेज आलेला नव्हता त्यामुळे त्यांनी २९/०१/२५ संध्याकाळी आंदोलन स्थळी स्पष्ट केले होते की,उद्या १२ वाजता म्हणजेच ३०/०१/२५ रोजी आंदोलन स्थळी समाज येईल समाज व उपोषण कर्त्याशी बोलून उद्या संवाद साधून आंदोलन चालू ठेवायचे का..! आंदोलन संपुष्टात आणायचे.ते ठरवणार,येथून पुढे उपोषण आंदोलन न करता समाजाची जी भूमिका राहील ती माझी भूमिका..!!

     अशा पद्धतीची भूमिका ते जाहीर करणार होते. दरम्यान अंतरवाली सराटी या ठिकाणाहून तेथील स्वयंसेवकाचा शिरूर येथील आंदोलन कर्त्यांशी संपर्क चालू होता उद्या बारा वाजेपर्यंत जरांगे पाटील समाजाशी चर्चा करून उपोषण सोडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा उपोषण सोडण्याची त्यांनी विनंती केली होती. वेळोवेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश जी केंजळे यांनीही आंदोलन स्थळी भेट देत प्रकृतीची चौकशी करत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती.सकाळी ११:०० वाजता तहसिलदार साहेब यांनी आंदोलन स्थळी भेट देत मागण्या संदर्भात चर्चा करत उपोषण सोडण्याची विनंती आंदोलन कर्त्यांना केली होती. शिरूर शहरातील सामाजिक सलोखा, ऐक्य संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणार असल्यामुळे या आंदोलनाला विविध जाती-धर्मातील पक्षातील कार्यकर्त्यांनी कोणत्यातरी जातीविरोधातलं आंदोलन आहे न समजता समाजाच्या न्याय- हक्कासाठी असणारं आंदोलन समजून पाठिंबा दिला आणि तुमच्या न्याय हक्कासाठी तुमच्या सोबत आहोत याचा दिलासा देत आमरण उपोषणाचं आंदोलन सोडण्याची ही विनंती केली.दुपारी १:०० वाजता माजी सैनिकांचं शिष्टमंडळ शिरूर पोलीस  निरीक्षका बरोबर चर्चा करण्यासाठी आले होते त्यांनी आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा दर्शवत एक मराठा, लाख मराठा..!! जय जवान, जय किसान.! छत्रपती शिवाजी महाराज की, जय..! तुमचे आमचे नाते,काय.! जय जिजाऊ,जय शिवराय..! अशा घोषणा देतात परिसर दणाणून सोडला. उपस्थित मराठा सेवक, विविध जाती, धर्मातील नागरिक व कार्यकर्त्यांनी, माजी सैनिकांच्या शिष्टमंडळांनी विनंती केल्यानंतर आंदोलन कर्त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश जी केंजळे व माजी सैनिकांच्या हाताने लिंबू सरबत घेत उपोषण सोडले.

  यावेळी आंदोलन स्थळी बोलताना मराठा सेवक व सामाजिक कार्यकर्ते सावळाराम दादा आवारी म्हणाले की ह्या संकट काळात फार थोडे राजकीय पुढारी अंतरवालीत व शिरूर मध्ये आले. निवडणुकीपूर्वी अंतरवालीत भेटी गाठींचे स्तोम माजले होते. 


निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर राजकीय पुढाऱ्यांचे निरनिराळे रंग पाहायला मिळाले. स्वार्थी, कामापुरते मामा उघडे पडले. 

   अखिल भारतीय मराठा महासंघाचे  मा अध्यक्ष व आपचे शिरूर शहराध्यक्ष  अनिल डांगे उपस्थिताशी संवाद साधताना म्हणाले की,पण जेव्हा समाजाला खरी गरज होती तेव्हा मोजकेच खरे उतरले.


आ.सुरेश अण्णा धस आणि खा.बजरंग बप्पा सोनवणे दोन्ही वाघ पक्षभेद बाजूला ठेऊन एकत्र आले. समाजासाठी तळमळीने धाऊन आलेल्या दोन्ही वाघांचे आभार. 

       त्याच बरोबर कुठल्याही परिणामाची चिंता न करता शिरूर येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी योग्य भूमिका घेणाऱ्या शिरूर मधील सर्व जाती धर्मातील वाघांचाही अभिमान राहील.


समाजभूषण, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेतृत्व आहे. त्यांचा त्याग आणि समर्पण आमच्यासाठी सर्वोच्च आहे. आमच्या काळजाला वेदना होऊ नयेत आणि येणाऱ्या काळात इतके टोकाचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी आगामी काळात आ सुरेश आण्णा धस व इतर ही आमदार यांनी आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे योग्य पाठपुरावा करावा अशी आम्ही विनंती करत आहोत.


यावेळी आंदोलन यशस्वी करण्यासाठी अविनाश घोगरे, विश्वनाथ पतंगे, प्रशांत बेंद्रे,संजय जी बारवकर, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सतीश धुमाळ, अभिजीत आंबेकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी कर्डिले, आम आदमी पार्टीचे समन्वयक नितीनजी पवार,निलेश नवले, सुनील डांगे, मनोज ढवळे, सुदाम चव्हाण, सुनील जाधव, स्वप्निल रेड्डी,निलेश वाळुंज,योगेश महाजन,भाऊ सरोदे, राहुल गिरमकर,कल्पना पुंडे, शोभना ताई पाचंगे,शशिकलाताई काळे, दीपक मोरे, पवन खेडकर, राहुल पाडळे, माऊली बोबडे,माऊली दुबे,नितीन गरड आदिशक्ती महिला मंडळ,वैशाली साखरे,सविता बोरुडे,प्रीती बनसोडे,चांदगुडे डंबेनाला गणेश मित्र मंडळ यांची मोलाची साथ लाभली.

      प्रामुख्याने मुकुंद ढोबळे, नितीन जी बारवकर, संतोष गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टी चेअशोक गुळादे, यशवंत उबाळे, मातंग संघटनेचे सतीश बागवे, भीमछावा संघटनेचे प्रकाश डंबाळे, सरद वाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जाधव,संघर्ष रिक्षा संघटनेचे चंद्रकांत माने, राजू जाधव, कैलास भोसले, आमदाबाद चे सरपंच, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, राणी ताई कर्डिले, अबरार काझी, शकूर सय्यद, शिवनेरी रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मुनोत, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंडू दुधाने, लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक, जयवंत कटके, अनिल सोनवणे, देवकीनंदन फंड,शिरूर कट्टा निलेश काळे, शौकत पटेल, हुसेन पठाण,तोशिफ तांबोळी,  शिरूर शहर रिक्षा संघटनेचे चंद्रकांत घोडके, अकील शहा इत्यादी व अनेक मान्यवरांनी भेट देत आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढवले

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!