तलवारीचा धाक दाखवुन घरामध्ये घुसुन जबरी चोरीचा प्रयत्न करणा-या एका आरोपीच्या शिरूर पोलिसांनी आवळ्या मुसक्या

Dhak Lekhanicha
0

 तलवारीचा धाक दाखवुन घरामध्ये घुसुन जबरी चोरीचा प्रयत्न करणा-या एका आरोपीच्या शिरूर पोलिसांनी आवळ्या मुसक्या 



शिरूर (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)-

शिरूर शहरात स्टेट बँक कॉलनी येथे घरामध्ये तीन अनोळखी चोरटयांनी प्रवेश करून  हिराबाई वाखारे हया हॉलमध्ये बसलेल्या असताना त्यापैकी एका इसमाने हातामध्ये तलवार घेवुन हिराबाई वाखारे वय ७० वर्ष यांचे गळयाला तलवार लावुन गळयामधील सोन्याची पोत हिसकावुन जबरी चोरी करून घेवुन जाण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हिराबाई यांनी आरडाओरड केल्याने ते चोर पळून गेले.

या घटनेमुळे शिरूर शरद एकच खळबळ उडाली होती.

या गुणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला गुन्हयामधील आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सूचना केल्याने त्या अनुशंगाने तपास पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पो हवा नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचीन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हाळनोर, अजय पाटील यांनी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत आरोपीचा शोध घेणेकामी तपासपथके रवाना केली. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान सी सी टी व्ही कॅमेरे व तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे शोध घेत असताना माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा नागेश अशोक अल्ले (रा. गोलेगाव रोड, वात्सल्य हॉस्पिटल शेजारी ता शिरूर जि पुणे) तो सध्या गोलेगाव रोड, शिरूर परीसरात असल्याची बातमी मिळाल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या गुन्हयाबाबात चौकशी केली असता, आरोपी नामे नागेश अशोक अल्ले याने दोन विधीसंर्धीत बालकांसोबत संगनमत करून त्यांचे घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी यांची सासु हिराबाई वाखारे वय ७० वर्ष यांचे गळयाला तलवार लावुन गळयातील सोन्याची पात हिसकावुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपी नामे नागेश अशोक अल्ले यास गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन त्यास मा न्यायालायाने दिनांक ०९/०१/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पो हवा नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.

शिरूर पोलिसांनी आरोपींच्या मुश्क्यामुळे शिरूर शहर व तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!