नामदार जयकुमार गोरे यांनी दिला माईंच्या आठवणींना उजाळा !द मदर ग्लोबल फॉउंडेशन शिरूर येथे दिली सदिच्छा भेट!

Dhak Lekhanicha
0

 नामदार जयकुमार गोरे यांनी दिला माईंच्या आठवणींना उजाळा !द मदर ग्लोबल फॉउंडेशन शिरूर येथे दिली सदिच्छा भेट!


शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी माई सिंधुताई सपकाळ यांच्या शिरूर येथील द मदर ग्लोबल फाऊंडेशन च्या 'माईनगरी' या अनाथ आश्रमाला भेट दिली,तसेच दौंड मतदार संघाचे आमदार मा.राहुल कुल यावेळी उपस्थित होते . माईंचे कार्य अविरत चालू राहणे म्हणजे माई आपल्यात असणे आहे, 'पाठी असावी माया आपुली अन् देवाचे छत्र...आम्ही फक्त निमित्तमात्र' हा माईंच्या कार्याचा गुरुमंत्र घेऊनच निःस्वार्थ सामजिक व राजकीय काम करण्यास मदत होते.माई आणि माझे भावनिक नाते होते,माझा अपघात झाला तेव्हा माई मला भेटायला आल्या होत्या.. माईंसारखी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली ह्याचा अभिमान आहे.संस्थेचे अध्यक्ष विनय सपकाळ हे नेहमी माझ्या संपर्कात असतात आणि त्याच्याकडून मला माईंच्या कार्याची माहिती मिळत असते असे त्यांनी यावेळी सांगितले, संस्थेतील मुलांशी संवाद साधत असताना माईंसोबतच्या गोड आठवणींना उजाळा नामदार जयकुमार गोरे यांनी दिला. माई परिवारातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी सदैव मदत करेन असे आश्वासन ही मंत्री महोदयांनी दिले. 

सिंधुताई सपकाळ माई म्हणजे अनाथ निराधार वंचितांचा आधार आहेत, त्यांचे हे काम कायमस्वरुपी चालू ठेवण्यात माझा नक्कीच खारीचा वाटा असेल, आम्ही ही माईंचे लेकरं च आहोत असे दौंड मतदार संघाचे आमदार ॲड. राहुल कुल म्हणाले.

मंत्री महोदयांचे आभार मानत असताना ही भेट माई परिवारातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरली असून, ह्यामुळे माईंचे कार्य अधिक बळकट होईल याची खात्री वाटते.. असे

द मदर ग्लोबल फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले म्हणाले. याप्रसंगी भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष.आबासाहेब सोनवणे, शिरूर ग्रामपंचायत उपसरपंच.बाबाजी अण्णा वर्पे, राहुल महाजन, बाळासाहेब पळसकर, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. यश सूर्यवंशी, अधिक्षिका मीनाक्षी लटांबळे व इतर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!