पत्रकार दिनानिमित्त शिरूर येथे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पत्रकारांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान!

Dhak Lekhanicha
0

 पत्रकार दिनानिमित्त शिरूर येथे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पत्रकारांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान!


 कार्यकारी संपादक :सुदर्शन दरेकर 

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दर वर्षी पत्रकार दीन साजरा केला जातो .

या दिनाचे औचित्य साधत पत्रकार बांधव यांना राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आज 6 जानेवारी 2025 सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

त्यानंतर अनेक पत्रकारांनी मनोगते व्यक्त केली .

शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे  यांच्या हस्ते सर्व पत्रकार बंधू यांना ट्रॉफी व पुष्गुच्छ देत राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार म्हणून गौरविण्यात आले.



लोकशाहीचा चौथा आधास्तंभ म्हणून पत्रकार यांचा कडे पाहिले जाते. समाजात अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे,चांगल्या गोष्टींना प्रसिध्दी देण्याचे काम पत्रकार बांधव करत असतात,त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे,त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना आज जो पुरस्कार दिला तो खरच प्रेरणादायी आहे.त्या बद्दल अध्यक्षा राणी कर्डिले यांचे आभार मानतो.

पोलीस नेहमीच तुमचा सोबत आहेत,सर्व पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक केंजळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पत्रकार खरच समाजाचा आधार स्तंभ असून त्यांचे महत्वाचे स्थान आहे,त्यांचा गौरव केला त्याबद्दल रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या आभार,पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते बापू सानप यांनी यावेळी दिल्या.

तसेच या कार्यक्रमाच्या शामकांत वर्पे, शोभना पाचंगे,गीता आढाव,शितल शर्मा उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!