लहूजी शक्ती सेना पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी विशाल उर्फ बंटी जोगदंड यांची निवड
शिरूर शहर (प्रतिनिधी)-
लहूजी शक्ती सेनेची राज्य स्तरीय बैठक पुणे जिल्ह्यातील सासवड येथे संपन्न झाली या बैठकीत विशाल उर्फ बंटी जोगदंड यांची पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी जाहीर केली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णु भाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे युवक प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ क्षीरसागर विद्यार्थी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत भाऊ खंदारे महाराष्ट्र अध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप महाराष्ट्र सदस्य नितीन भाऊ वायदंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
विशाल उर्फ बंटी जोगदंड हे अनेक वर्षा पासून संघटनेत काम करत आहेत. अगदी कमी वया पासून ते संघटनेच्या सदस्य पदापासून त्यांनी सुरुवात केली होती. नंतर शिरूर शहर अध्यक्ष पदाची सुद्धा जबाबदारी स्वीकारली होती.
शिरूर शहराच्या शहराध्यक्षपदी असताना त्यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन करून गोरगरीब समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे.
त्यांच्या याच कामाची दखल घेत लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी त्यांच्यावर पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
यावेळी धाक लेखणीच्या पत्रकाराची बोलताना विशाल उर्फ बंटी जोगदंड म्हणाले की मी संघटनेचे प्रामाणिकपणे काम करणार असून संघटना तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहे.व पुणे जिल्ह्यातून युवकांची फळी उभारणार आहे.
जोगदंड यांच्या निवडीनंतर ॲड.अमोल पठारे, संकेत पाडळे, गणेश जाधव,इच्छापूर्ती श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष स्वप्निल रणदिवे,उपाध्यक्ष तुषार उर्फ नानू भवाळ, अविनाश साबळे,शुभम जाधव यांनी अभिनंदन केले.
