दादाभाऊ लोखंडे यांची लहूजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी निवड
(शिरूर प्रतिनिधी -)
शिरूर शहरातील लहुजी शक्ती सेनेत कार्यरत असणारे दादाभाऊ लोखंडे यांची लहूजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी निवड करण्यात आली.
सासवड येथे लहुजी शक्ती सेनेची महाराष्ट्र राज्य स्तरीय बैठक बोलावली होती.
या बैठकीत लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी दादाभाऊ लोखंडे यांची निवड जाहीर करुन त्यांना निवडीचे पत्र दिले.
दादाभाऊ लोखंडे यांनी लहुजी शक्ती सेना शहर व तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे.
तसेच त्यांनी शिरूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे,शिरूर शहरातील झोपडपट्टी धारकांचे आहेत त्याच जागेवर पुनर्वसन करून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा,शिरूर शहरातील लाटे आणि भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नावे स्वागत कमान उभारावी,तालुक्यातील प्रत्येक गावात मातंग वस्तीत समाज मंदिर व्हावे यासाठी मागणीसाठी शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय समोर उपोषण केले होते. समाजसाठी व समाजाच्या विविध मागण्यासाठी दादाभाऊ लोखंडे हे नेहमी प्रयत्नशील असतात असे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे म्हणाले.
यावेळी दादाभाऊ लोखंडे म्हणाले की लहुजी शक्ती सेना संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे काम करणार आहे.
यावेळी संपूर्ण महाराष्ट्र व शिरूर शहरातुन दादाभाऊ लोखंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
.jpg)