"जबरी चोरीचा प्रयत्न करणा-या चोरटयाच्या शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आवळल्या मुसक्या" तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी
शिरूर:सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )
किसन रामचंद्र बोडरे रा. गुजरमळा शिरूर ता शिरूर जि पुणे यांनी फिर्याद दिली की, शिरूर ता शिरूर जि पुणे गावचे हद्दीत विदयाधाम शाळेसमोरून फिर्यादी पायी चालत जात असताना त्यांचे पाठीमागुन यातील आरोपी नामे मंगेश आलटु भोसले वय १९ वर्ष, रा. पाण्याची टाकीजवळ शिरूर ता शिरूर जि पुणे याने येवुन फिर्यादीस थक्का मारून हात पकडुन फिर्यादीचे शर्टचे वरचे खिशात हात घालुन त्यांचे खिशामधील मोबाईल व पैसे काढुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी मंगेश आलटु भोसल हा बिजे कॉर्नर शिरूर येथे असल्याबाबत माहीती पोलीस पो नि संदेश केंजळे यांना मिळाल्याने तात्काळ तपास पथकाला गुन्हयामधील आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर ठिकाणी पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात यांनी जावुन शहरामधील नागरीकांचे मदतीने आरोपी मंगेश अल्दु भोसले यास सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेतले असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. शिवाजी बनकर करीत आहेत.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक साो. श्री. पंकज देशमुख साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो. श्री. प्रशांत ढोले साो, मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे सो यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने, पोलीस हवालदार विनोद मोरे, नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, नितेश थोरात, विनोद काळे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली.
