पाबळ केन्दुर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची घोडदौड पाबळ पंचायत समिती गणात वंदनाकाकी पवार यांनी प्रचारात घेतली आघाडी
पाबळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत पाबळ गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले आणि पंचायत समिती उमेदवार वंदना काकी पवार यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पक्षाने बाजार समितीच्या माध्यमातून केलेले कामे त्याच बरोबर या भागात केलेले विविध विकास कामे व कार्यकर्त्यांची मोठी फळी यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाबळ येथे उभारलेले बाजार समितीचे मोठे मार्केट शेतकरी वर्गासाठी राबवलेल्या योजनांचा फायदा या निवडणुकीत उमेदवारांना होताना दिसत आहे. तर प्रकाश पवार यांचा 'दांडगा जनसंपर्क' ठरतोय 'गेमचेंजर' या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळत असलेल्या आघाडीचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रकाश पवार यांचा असलेला अफाट जनसंपर्क.मागील तीस वर्षांत प्रकाश पवार यांनी प्रत्येक गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन लोकांशी थेट संवाद साधला आहे. त्यांच्या शब्दाला असलेला मान आणि लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे राष्ट्रवादीची बाजू अधिक भक्कम झाली आहे.त्याच बरोबर युवा आणि ज्येष्ठ मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा यामुळे व कार्यकर्त्यांचे असलेले जाळे यामुळे प्रफुल्ल शिवले आणि वंदना काकी पवार यांच्या कार्याची माहिती घराघरात पोहोचवली जात असून ३० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने पाबळ परिसरात रस्ते,लाईट ,शिक्षण, आणि पाणी या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रफुल्ल शिवले यांचे विकासात्मक व्हिजन आणि वंदना काकी पवार यांचा महिला सक्षमीकरणातील पुढाकार यामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे.
"बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आमचा ३० वर्षांचा विकास या जोरावर आम्ही यंदा ऐतिहासिक विजय मिळवू," असा ठाम विश्वास प्रफुल्ल शिवले आणि वंदना काकी पवार व केन्दुर गणातील सुचित्रा थिटे यांनी व्यक्त केला आहे.
