शिरूर तालुक्यात वाढला गावठी कट्टा! कायदा-सुव्यवस्थेची झाली थट्टा ;लाचखोरी मुळे शिरूर पोलिसांच्या प्रतिमेला लागला बट्टा"

Dhak Lekhanicha
0

 शिरूर तालुक्यात वाढला गावठी कट्टा! कायदा-सुव्यवस्थेची झाली थट्टा ;लाचखोरी मुळे शिरूर पोलिसांच्या प्रतिमेला लागला बट्टा"



शिरूर : शिरूर तालुक्यात गावठी कट्टे व बेकायदा शस्त्रांचा वाढता वापर हा चिंतेचा विषय बनला आहे. किरकोळ वाद, जुने वैमनस्य तसेच टोळीयुद्धातून थेट गोळीबार आणि रक्तपाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मागील सहा महिन्यांत शिरूर तालुक्यात गोळीबाराच्या तब्बल पाच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर एका घटनेत एक तरुण जखमी झाला. याच कालावधीत रांजणगाव गणपती येथे झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेतही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे किरकोळ वाद, जुने वैमनस्य आणि टोळीयुद्ध आता थेट रक्तपातापर्यंत पोहोचत असल्याचे भयावह चित्र शिरूर तालुक्यात समोर आले आहे.


गावठी कट्टे व अवैध शस्त्रे सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळत असल्याची नागरिकांची भावना आहे. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी अशा घटना पुन्हा-पुन्हा घडत असल्याने अवैध शस्त्रांचा पुरवठा करणारे आणि त्यांचा वापर करणारे नेमके कोण, याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नुकतेच शिरूर पोलीस स्टेशन च्या दोन पोलिसांवर लाच लुचपत विभागाने कारवाई केली. लाच घेताना एकाला रंगे हात पकडले तर दुसऱ्या कारवाईत चक्क लाचेचे पैसे घेऊन पोलिस पळून गेला.

तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा “शिरूर तालुक्यात वाढला गावठी कट्टा, कायदा-सुव्यवस्थेची झाली थट्टा आणि लाचखोरीमुळे शिरूर पोलिसांच्या प्रतिमेला लागला बट्टा ” येणाऱ्या काळात अशीच स्थिती राहण्याची भीती सर्व सामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!