मुरली कृष्णा फार्मा कंपनीच्या संचालिका सीतामहालक्ष्मी छल्ला यांचे निधन

Dhak Lekhanicha
0

 मुरली कृष्णा फार्मा कंपनीच्या संचालिका सीतामहालक्ष्मी छल्ला यांचे निधन


शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)


शिरूर (दि. १२ ऑगस्ट) – जगभरातील औषधनिर्माण क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या मुरली कृष्णा फार्मा कंपनीच्या संचालिका सीतामहालक्ष्मी छल्ला यांचे मंगळवारी शिरूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या.


मूळच्या आंध्र प्रदेशातील असलेल्या सीतामहालक्ष्मी यांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे मुरली कृष्णा फार्मा कंपनीची स्थापना केली. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी संचालकपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. कंपनीच्या औषधनिर्मिती उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असून, यशस्वी व्यवसायवृद्धीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला.


त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सत्यरमाणी वदलामणी यांनी व्यवसायाचा विस्तार जगभरात केला आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


शिरूर येथे पार पडलेल्या त्यांच्या अंत्यविधीस मुरली कृष्णा फार्मा परिवारातील सदस्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!