शिरसगाव काटा येथे घरफोडी; वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने लंपास

Dhak Lekhanicha
0

 शिरसगाव काटा येथे घरफोडी; वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने लंपास



शिरूर – (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)- तालुक्यातील शिरसगाव काटा येथे 10 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत तब्बल ₹1 लाख 40 हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमोल अशोक कुंजीर (वय 31, रा. चव्हाणवाडी, शिरसगाव काटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 10.15 वाजेपासून ते 11 ऑगस्टच्या मध्यरात्री 12.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात इसमांनी त्यांच्या राहत्या घरात जबरदस्ती प्रवेश केला. चोरट्यांनी कुंजीर यांच्या आईला तोंडावर व डोक्यात मारहाण करून दोन गंठण, कानातील फुले व वेल तसेच मनी मंगळसूत्र असा एकूण ₹1,40,000 किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला.


या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी गुन्हा नोंदवला असून, तपासाची धुरा पोलीस उपनिरीक्षक नकाते यांच्या हाती आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कामाला लागली असून, सीसीटीव्ही फूटेज व इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!