रामलिंग येथे वंचित घटकातील मुलांना दुध देऊन नागपंचमी साजरी
शिरूर - (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रामलिंग येथील भिल्ल वस्तीतील मुलांना दुध देऊन साजरी करण्यात आली.
नागपंचमी हा सण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.महिला फेर धरून गाणी गात वारुळाला जाऊन त्याचे पूजन करून,त्यामध्ये लाह्या,दूध ओतत असतात,त्यांना वाटते नाग हा दुध पित असतो.
परंतु ही अंधश्रध्दा आहे.हे दुध नाग पित नाही,ते वाया जाते.त्या एवजी ते दुध गोर गरीब मुलांना प्यायला दिले तर ते त्यांचा मुखी जाईल.अनेक मुलांना दुध काय असते हे माहित सुध्दा नसते,म्हणून महिलांनी जिथे जमेल तिथे ,एक ग्लास दुध तरी गरजूंना प्यायला द्यावे,तेव्हा खऱ्या अर्थाने नागपंचमी हा सन साजरा होईल.असे मत रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा -- राणी कर्डिले यांनी व्यक्त केले.
भिल्ल वस्तीवर मुलांसोबत महिलांनी झोके घेतले,या मुलांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता,तो पाहून महिलाही आनंदित झाल्या.
रामलिंग येथे पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा झाला.
यावेळी अर्चना कर्डिले,माया रेपाळे,छाया जगदाळे, मिनल लेकुरवाळे कु .सायली जगदाळे आदी महिला उपस्थित होत्या.
