रामलिंग येथे वटपौर्णिमेनिमित्त वडाचे झाड लावून अनोखी साजरी
केली वटपौर्णिमा,
रामलिंग शिरूर (कार्यकारी संपादक)– सुदर्शन दरेकर
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वटपौर्णिमेचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी वडाचे झाड लावून महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमा हा सण संपूर्ण देशात श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी वडाच्या झाडाचे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
वडाच्या झाडाचे औषधी गुणधर्म आणि पर्यावरणीय महत्त्व मोठे आहे. याच झाडापासून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो. कोरोना काळात याचे महत्व सर्वांना प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी प्राणवायूचा स्रोत अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेनं वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई दौंडकर, लता इसवे, यशोधा दसगुडे, तांबे मॅडम, डॉ. स्मिता कवाद, गीता आढाव, छाया अल्हाड, अर्चना कर्डिले, माया रेपाळे, छाया जगदाळे, राधा रेपाळे, कविता करंजुले, रुपाली बोर्डे, अँटी लोंढे यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि उपस्थित महिलांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.

