प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने रामलिंग महाराजांना दुग्धाभिषेक

Dhak Lekhanicha
0

 प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने रामलिंग महाराजांना दुग्धाभिषेक



शिरूर (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)- 

प्रहार संघटनेचे अध्यक्ष दिव्यांगांचे दैवत बच्चुभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.

 अन्नत्याग उपोषणामुळे बच्चू कडू यांची तब्येत खालावली आहे.

आज अमरावती चे पालकमंत्री बावणकुळे यांनी सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिल्याने बच्चुभाऊ यांनी उपोषण सोडले आहे. 

प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने वतीने आज शिरूर येथे रामलिंग महाराजांना दुग्धाभिषेक घालून महाआरती करण्यात आली.

बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित झाल्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी प्रहार पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय तरटे,व्यवस्थापक महेंद्र निंबाळकर, संस्थापक व संचालक तुषार हिरवे, मनेष सोनवणे,रामदास भुजबळ, स्वातीताई निंबाळकर,यांनी जोडीने रामलिंग महाराजांना अभिषेक घालून महा आरती करण्यात आली.

 बच्चुभाऊ यांची तब्बेत लवकरात लवकर चांगली व्हावी म्हणून प्रार्थना करण्यात आली.यावेळी ज्योती गोसावी, नयना परदेशी,सुनिल नरसाळे,सुरज गुप्ता,अमोल माळवदकर, रेणुका मल्लाव,शितल कोतवाल,कान्होपात्रा मंबडवाड,तन्वी कोतवाल,रेखा कोतवाल ह प्रहार सेवक उपस्थित होते. पालकमंत्री बावणकुळे सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिले.

  बच्चुभाऊ चे आदोंलन यशस्वी झाले व उपोषण स्थगित केले त्यामुळे शिरूर मध्ये आनंद साजरा करण्यात आला.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!