निर्धार सदृढ आरोग्याचा,संकल्प स्वस्थ भारताचा ! शिरूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
शिरूर- (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)-
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिरूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने आज शेकडो नागरिकांसमवेत योग साधना करत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे विचार सामुहिकरीत्या ऐकले. 'एक पृथ्वी, एक आरोग्य' या संकल्पनेवर आधारित या यंदाच्या या योग शिबिराचं आयोजन केंद्रीय आयुष्य मंत्रालय आणि केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्या सहकार्यातून करण्यात आलं होतं. गेली 8 वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी जागतिक पातळीवर २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतीय परंपरा आणि संस्कृतीवर जागतिक पातळीवर उमटलेली ही एक मोहोरच होती. आज जगभरात योग साधनेचा झालेला प्रचार आणि प्रचार हे निश्चितच आजच्या जागतिक योग दिनाचं यश म्हणावं लागेल !
शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी व शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे आणि शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली माजी शहर अध्यक्ष केशव लोखंडे यांनी योग्य दिनाचे आयोजन केले.
या वेळी भारतीय जनता पार्टी चे कामगार जिल्हा अल्पसंख्यक चे अध्यक्ष राजू शेख, शहर सरचिटणीस विजय नरके, हुसेन शहा, ओमकार ससाणे,आकाश चाकणे, तुषार वेताळ,निलेश नवले, माई ठुबे,पांचाळ ताई, अनघा पाठक, राजू चोंधे, शिवाजी गाडे, प्रा अशोक शेळके, मनिषा चोरे, योगेश जामदार,प्रा.सतीश धुमाळ, तेजस टाक, शंतनु कोळपे, आर्यन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
.jpg)