शिरूर शहरात 'इंडिया मोबाईल' शोरूमचे बिग बॉस फेम सूरज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

Dhak Lekhanicha
0

 शिरूर शहरात 'इंडिया मोबाईल' शोरूमचे बिग बॉस फेम सूरज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन


शिरूर :-सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )

 शिरूर शहरातील "निर्माण प्लाझा" येथे 'इंडिया मोबाईल' या अध्यायवत मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन नुकतेच मराठी बिग बॉस फेम आणि रील स्टार सूरज चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला शिरूरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली असून, विशेषतः तरुणाईमध्ये या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली.

 यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, कार्यासिन अधिकारी प्रविण शिशुपाल,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, शिरूर चे माजी नगराध्यक्ष रवी उर्फ शाम मनोहर ढोबळे, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद कालेवार, प्रवीण दसगुडे, भाजपाचे नेते धर्मेंद्र खांडरे, शिरूर प्रवासी संघटनेचे अनिल बांडे,लोक नियुक्त सरपंच विठ्ठल घावटेइत्यादी मान्यवर उपस्थित होते.


शोरूमचे आयोजक हाजी रुस्तुम सय्यद व अकबर पठाण यांनी या अध्यायवत मोबाईल दालनाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, "शिरूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार मोबाईल व अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे."

उद्घाटन प्रसंगी बोलताना सूरज चव्हाण यांनी आपल्या खास अंदाजात "हे माझं क्षेत्र आहे, आणि इथूनच मी सुरूवात केली होती!" अशा लोकप्रिय डायलॉग्समधून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली होती.

या उद्घाटन सोहळ्याला शिरूर शहरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, व्यापारी आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'इंडिया मोबाईल' शोरूममुळे शिरूरमध्ये मोबाईल खरेदीचा एक नवा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे, असे नागरिकांतून मत व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हाजी रुस्तुम सय्यद,अकबर पठाण यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!