शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद

Dhak Lekhanicha
0

 शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद


शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई

शिरूर : सुदर्शन दरेकर 

शहरातील मार्केट यार्ड येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी तपास सुरू असताना शिरूर पोलीस तपास पथकाने परजिल्ह्यातून एक सराईत चोरटा जेरबंद केला आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.


दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत शिरूर येथील मार्केट यार्ड परिसरात पार्क करण्यात आलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेली होती. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरूर शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी बापू गजानन थोरात (वय ३५, रा. बोळेगाव, ता. जि. अहिल्यानगर) याची ओळख पटवण्यात आली.


पुढील कारवाई करत नागापूर एमआयडीसी परिसरातून आरोपीला शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्याकडून काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच १३ बीजी ६९२७) जप्त करण्यात आली असून चॅसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणीही करण्यात आली आहे.


आरोपी बापू थोरात हा पुणे ग्रामीण, पुणे शहर, अहिल्यानगर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोटारसायकल चोरीसंदर्भात एकूण ९ गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी खेडकर करत आहेत.


ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी सहभाग घेतला.

शहरात मोटारसायकल चोरीस आळा घालण्याच्या दृष्टीने शिरूर पोलीस ठाण्याची ही कारवाई उल्लेखनीय मानली जात आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!