सध्याच्या डिजिटल युगात आपली व्यक्तिगत माहिती प्रसार माध्यमावर टाकण्याचा अतिरेक नको- मुक्ता चैतन्य
शिरूर : सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)
शिरूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचे 28 वे वर्ष असून मान्यवर तज्ञांचे विचार शिरूरकरांना ऐकण्यासाठी मोठी पर्वणी मिळालेली आहे. आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी मुक्ता चैतन्य यांचे डिजिटल युगात मोबाईलचा वापर व लहान मुलांच्या हातातील मोबाईल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आपल्या दैनंदिन व
आधुनिक जगण्याची डिजिटल आव्हाने व मुलांच्या आयुष्यावर होणारे मोबाईलचे दुष्परिणाम यावर मुक्ता चैतन्य आपले विचार व्यक्त करताना सांगितले की आज मोबाईल आपल्या प्रत्येकाचा जीवनाचा भाग बनलेला आहे.
आपण कुठल्या दुसऱ्या गावात राहता किंवा इतर कोणत्याही शहरात राहत असाल तरी डिजिटल माध्यमांनी आपला घराच्या आत मध्ये प्रवेश केलेला असून ते सध्याच्या काळात अपरिहार्य झाले असून त्याची काळजी घेऊन वापर करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाचे डिजिटल प्रोफाइल प्रत्येक सेकंदात अपडेट होत असते. आपल्या आवडीनिवडी आपण काय खरेदी करतो याची डिजिटल नोंद झालेली असते. सध्याच्या जगामध्ये बातम्यांची खोटी बाजारपेठ ही हजारो करोड रुपयांची आहे, आपण डिजिटल जगातले गुलाम होत आहोत ही वास्तव परिस्थिती सध्याच्या काळात आहे.सध्याच्या जगात आपल्या मुलांचे डिजिटल प्रोफाइल तयार होईल असे फोटो समाज माध्यमांवर टाकू नये. त्याचे परिणाम मुलांच्या खाजगी माहितिचा चुकीचा वापर होऊ शकतो. सध्याच्या डिजिटल युगात वावरणारे आपली पहिलीच पिढी आहे आपल्याकडे त्याचा पूर्व अनुभव नाही. सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता ( आर्टिफिशल इंटेलिजन्स ) याविषयी मोठी क्रांती होऊ घातलेली आहे मुक्ता चैतन्य आणि सांगितले सध्याचे मोबाईलचे हँडसेट हे कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त असून आपली माहिती आपण सोशल मीडियातून काढून टाकली तरी ती डिजिटल युगात कायमस्वरूपी राहते. त्यामुळे डिजिटल युगाचा अतिरेक टाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात कोरोनाच्या लाटेनंतर मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला असून, भारतातील मुलांच्या हातात मोबाईल येण्याची ती सुरुवात असल्याची त्यांनी सांगितले सध्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणे हे पालकांपुढे मोठे आव्हान असून देशभरातल्या वेगवेगळ्या संस्थांनी काढलेले निष्कर्ष पालकांनी आवर्जून पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला आशाताई पाचंगे, डॉ. सुनिता पोटे, मायाताई गायकवाड, एड,भाग्यश्री बोरा, योगिता पाचंगे उत्सव समितीचे संयोजक रवींद्र धनक आदी मान्यवर उपस्थित होते.
