शिरूर येथे मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल शिरूर प्रतिनिधी :

Dhak Lekhanicha
0

 शिरूर येथे मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल 


शिरूर प्रतिनिधी :

        शिरूर माणिकचंद हॉस्पिटल समोर मागील वादाच्या कारणावरून दोन अनोळखी तरुणांनी एकास दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        अविनाश श्रीधर पारसवार( वय ४६ वर्षे धंदा अॅब्युलन्स चालक रा. नविन नगरपरिषद रोड १९/२१ ओंकार एमआरआय सेंटर जवळ शिरूर ता. शिरूर जि. पुणे)यांनी फिर्याद दिली आहे.

        शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शिरूर शहरातील माणिकचंद हॉस्पिटल समोर मोटारसायकल नंबर एन.एच. ३८ ए.बी.९८०५ ही वरील दोन अनोळखी इसम हे त्यांची मोटार सायकलवरून येवुन मी त्यांना चांदणी बार अॅन्ड रेस्टॉरन्ट मध्ये तुम्ही आपआपसात गडबड गोंधळ करू नका तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे असे समजुन सांगीतलेचे कारणावरून चिडुन जावुन त्या दोघांनी मला दगडाने मारहाण करून जखमी केले.

       शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंदजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल खेडकर करीत आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!