क्रांती तरुण मंडळाने केली शिवजयंती धडाक्यात साजरी
शिरूर प्रतिनिधी - बोऱ्हाडे मळा येथे क्रांती तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे भव्य शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी 10.30 वाजता मंडळाचे ट्रस्टी आप्पासाहेब वर्पे यांच्या हस्ते शिवछत्रपतींना पुष्पहार घालून आणि ज्योत प्रज्वलित करून शिवगर्जनांच्या जयघोषात शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.
सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळाच्या मार्फत करण्यात आले. अनेक चिमुकल्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. पोवाडे, शिवगीते, शिवकालीन प्रसंग, वेशभूषा, साहसी खेळ असे एक न अनेक कार्यक्रम झाले. सर्व सहभागी चिमुकल्यांना बक्षिस वाटप केले.
कार्यक्रमास मंडळाचे ट्रस्टी शामकांत वर्पे,सभासद गणेश किसन वर्पे,संतोष बोऱ्हाडे,गणेश रमेश बोऱ्हाडे उपस्थित होते.
मंडळाचे सभासद चेतन बोऱ्हाडे,प्रदीप वर्पे,राहुल वर्पे,आदित्य बोऱ्हाडे,विशाल वर्पे,आदेश वर्पे,अक्षय वर्पे,अक्षय बोऱ्हाडे,आकाश बोऱ्हाडे,अजित सूर्यवंशी,केतन बोऱ्हाडे आणि अमित वर्पे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.


