हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिरूर शहरात विविध कार्यक्रम घेऊन साजरी
(शिरूर प्रतिनिधी) - शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिरूर शहरात विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त
शिरूर नगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले व शिरूर शहरात वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती शिरूर शहर प्रमुख मयूर थोरात यांनी दिली.
यावेळी मयूर तुलाच म्हणाले की शिवसेनाप्रमुखांचे विचार हे शिवसैनिकांना नेहमी प्रेरणा देत राहतील.
यावेळी शहर संघटक सुरेश गाडेकर, उपशहर प्रमुख गणेश गिरे, उपशहर प्रमुख भरत जोशी, उपशहर प्रमुख सागर गव्हाणे, उपशहर प्रमुख ॲड.शुभम माळी,उपशहर प्रमुख यश दरेकर, विभाग प्रमुख गणेश लोखंडे व शिवसैनिक उपस्थित होते.
