श्रीराम मंदिरात झालेल्या प्रकाराबाबत बजरंग सेनेच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर उर्फ माउली आबा कटके यांना दिले निवेदन

Dhak Lekhanicha
0

 श्रीराम मंदिरात झालेल्या प्रकाराबाबत बजरंग सेनेच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर उर्फ माउली आबा कटके यांना दिले निवेदन 




शिरूर शहर प्रतिनिधी)-

शिरूर शहरातील प्रभु श्री राम मंदीरात मांसाहार करणाऱ्यांवर आणि मंदीराबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या ट्रस्टींवर कारवाई करण्यात यावी यासाठी बजरंग सेनेने आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांना निवेदन दिले.



दिनांक 2-12-2024 रोजी शिरुर शहरातील प्रभु श्री राम मंदीरात अज्ञात व्यक्तीनीं मांसाहार व तुकडे मंदिर परिसराल फेकल्याचे आढळूण आले आहे. यामुळे शिरूर शहर आणि परिसरातिल हिंदूंच्या भावना दुखावल्या त्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बजरंग सेना व सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. 



बंदच्या हाके मुळे संपूर्ण शहर व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दुपारी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके हे स्वतः शिरूर शहरात येऊन श्रीराम मंदिरामध्ये जाऊन पाहणे केली. आमदार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या ज्यांनी कोणी हे कृत्य केले त्याच्यावर कटोरात कठोर कारवाई करण्यात यावी. आमदारांनी आश्वासन दिल्यानंतर शिरूर शहरातील बंद मागे घेण्यात आला. 

यावेळी बजरंग सेनेच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांना निवेदन देण्यात तसेच शिरूर बंद चे निवेदन सकल हिंदू समाजाच्यावतीने रविंद्र बैनाडे, आकाश चाकणे,चेतन तुबाकी, प्रसन्न भोसले व बजरंग सेना व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देण्यात आले.

या घटनेमुळे समाजात तीव्र प्रतिक्रीचा उमटू लागल्या आहेत. या घटनेला मंदिर प्रशासन देखील जबाबदार आहे.

कारण यांनी मंदिराच्या सुरक्षेची कसलीही सोय केलेली नाही. पुढे निवेदनात असे म्हटले आहे की राज्यात महायुतीचे हिंदुत्ववादि सरकार असुन आपण या सरकारचे आमदार आहात. 

तरी आपण या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत अधिकात्यांना निर्देश द्यावे की मंदिरात मांसाहार करणायावर आणि निष्क्रीय मंदिर प्रशासन ट्रस्टी यांवर कारवाई करावी आणि अनेक वर्षापासून मंदिराचे रखडलेले बांधकाम कसे पूर्णत्वास नेता येईल याचा पाठ पुरावा करावा.

यावेळी बजरंग सेनेचे उमेश शेळके,श्रीराम सेनेचे सुनील जाधव, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे,शहर अध्यक्ष शरद कालेवार, जिल्हा सह संयोजक अजिंक्य तारू,नितीन आवचार, उमेश जगदाळे,राकेश परदेशी,देवानंद चव्हाण,पुष्कर कर्णावट,चेतन दाते,आविष्कार लांडे,अविनाश जाधव,प्रवीण झुंजूरके,हर्षद ओस्तवाल,तुषार भदाणे,सचिन गरुडे,केशव लोखंडे उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!