शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील आरती राम दसगुडे हिची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघामध्ये निवड

Dhak Lekhanicha
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील आरती राम दसगुडे हिची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
     शिरूर शहरातील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड झालेली पहिलीच महिला आहे.  
     आरती राम दसगुडे ही गेली सहा ते सात वर्षापासून शिरूर स्पोर्ट क्लब येथील प्रशिक्षक आशिष (लखन )कोळपकर व रविंद्र ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवत होती. 
       अनेक वर्षापासून ती सातत्याने महाराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी प्रयत्न करत होती परंतु अनेक वेळा तिला निराशा पदरी आली. 
      अखेर यंदाच्या वर्षी तिने यशाला गवसणी घातली असून, महाराष्ट्र महिला क्रिकेट संघामध्ये तिने आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे शिरूर शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आरती दसगुडे यांच्या नावाने लावला गेला आहे. 
     आरती यांच्या आई वडील शेतकरी आहे.
       आरती दसगुडे यांच्या निवडीबद्दल तिचे शिरूरचे आमदार ॲड.अशोक पवार उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांनी अभिनंदन केले आहे.
           गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होते. यावेळी जिद्द आणि चिकाटीने अनेक स्पर्धा गाजवल्या आहे. परंतु राज्य व देशाकडून खेळण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी शंभर टक्के देत होते. परंतु ध्येयापर्यंत जाऊ शकत नव्हते. अखेर यंदा हे ध्येयमी पूर्ण करून महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. याचे सोने करून देशाच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवण्याची इच्छा आहे. 
          आरती राम दसगुडे, महिला क्रिकेटर
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!