शिरूरमध्ये शिवमहापुराण कथामृताचा भव्य सोहळा पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून शिवकथेचा लाभ

Dhak Lekhanicha
0

 शिरूरमध्ये शिवमहापुराण कथामृताचा भव्य सोहळा पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून शिवकथेचा लाभ


शिरूर, ता. १९ (प्रतिनिधी): शिरूर येथील स्व. रसिकलाल धारिवाल नगरी, रामलिंग रोड परिसरात मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दिनांक २ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत भव्य शिवमहापुराण कथावाचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसीय धार्मिक कार्यक्रमामुळे शिरूर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून भाविकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन पी. आर. धारिवाल फाउंडेशनतर्फे उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या परंपरेतून हा उपक्रम साकारला जात असून धारिवाल परिवाराचे विशेष सहकार्य लाभत आहे.


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या ओजस्वी आणि प्रभावी शैलीतून शिवमहापुराणातील दिव्य प्रसंग, शिवतत्त्वज्ञान, भक्तीमार्ग तसेच जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या प्रेरणादायी कथा भाविकांना अनुभवता येणार आहेत. त्यांच्या अमृतवाणीतून शिवभक्तांना अध्यात्मिक उन्नतीचा संदेश मिळणार आहे.

रामलिंग रोड, शिरूर येथे होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी शिरूर परिसरासह पंचक्रोशीतील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “सर्व विघ्नहर व मंगलमय अशा या कथामृताचा लाभ सहपरिवार घ्यावा,” असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवकृपा, भक्तीभाव आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाशभाऊ धारिवाल यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!