रुबी हॉल क्लिनिक शिरूर येथे मराठी पत्रकार दिन साजरा

Dhak Lekhanicha
0

 रुबी हॉल क्लिनिक शिरूर येथे मराठी पत्रकार दिन साजरा


शिरूर-सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )

 ६ जानेवारी २०२६ रोजी आरएमडी फाउंडेशन संचालित धारिवाल हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक शिरूर यांच्या वतीने मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम रुबी हॉल क्लिनिक शिरूरचे डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ. संजीव तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी हॉस्पिटलमधील पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये डॉ. मयूर तायडे (हृदयरोगतज्ञ), डॉ. विशाल पानशेवडेकर (जनरल सर्जन), डॉ. व्यंकटेश सोनकवडे (ऑर्थोपेडिक सर्जन) आणि डॉ. गौरव शिंदे (फॅमिली फिजिशियन) यांचा समावेश होता. तसेच हॉस्पिटलचे युनिट हेड श्री. मायकल पॉल हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमात पत्रकारितेचे समाजातील महत्त्व, आरोग्य विषयक जनजागृतीमध्ये माध्यमांची भूमिका यावर विचार मांडण्यात आले. याप्रसंगी हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

या उपक्रमामुळे पत्रकार व आरोग्य सेवा यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!