अभिनव विद्यालय, सरदवाडी येथे अपूर्व विज्ञान मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद
सरदवाडी (ता. शिरूर) :
अभिनव विद्यालय, सरदवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग, आकर्षक मांडणी व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अभूतपूर्व गर्दी झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली वैज्ञानिक उपकरणे, प्रयोग तसेच भाजीपाला व खाद्यपदार्थांचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. लताताई कर्डिले, उपसरपंच श्री. सोमनाथ सरोदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गणेश सरोदे, उमेश सरोदे, मोनाली कर्डिले, शिल्पा घावटे, मा. मुख्याध्यापक श्री. अरुण गोरडे सर, श्री. दादाभाऊ घावटे सर, उद्योजक श्री. संतोष सरोदे, पत्रकार बाळासाहेब जाधव, रामभाऊ सरोदे, प्रविण कर्डिले, गणेश कर्डिले शिवाजी घावटे श्री दत्तात्रय कुंडलिक ,बापू महाराज घावटे,तसेच मॅजिक बस फाउंडेशनचे उमेश साळवी सर व त्यांची टीम उपस्थित होती.शिक्षकवर्ग, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रासकर मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन श्री. संदीप सरोदे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती खिलारे मॅडम यांनी मानले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब सरोदे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक क्षमता या प्रदर्शनातून स्पष्टपणे दिसून येते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. शाळेचे कार्य कौतुकास्पद आहे.”
सरपंच सौ. लताताई कर्डिले यांनी मनोगतात सांगितले, “विद्यार्थ्यांनी विज्ञानासोबतच आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमाला ग्रामपंचायतीचे सहकार्य राहील.”
माजी मुख्याध्यापक श्री. अरुण गोरडे सर म्हणाले, “विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.”
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खामकर सर आपल्या मनोगतात म्हणाले
“अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, प्रयोगशीलता आणि नवविचारांची जाणीव निर्माण होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग कौतुकास्पद असून शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत याचे हे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो.”
अपूर्व विज्ञान मेळावा,प्रदर्शनासाठी राहुल निरवणे,राहुल शेळके,कैलास सरोदे,किसन निरवणे,दीपक सरोदे,पत्रकार सुदर्शन दरेकर,पोपट पाचंगे,सोपान सरोदे आणि पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रत्यय उपस्थितांना आला.
