रांजणगाव गणपती येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचा भव्य पुणे जिल्हा मेळावा संपन्न
रांजणगाव गणपती - (सुदर्शन दरेकर कार्यकारी संपादक)
महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचा भव्य पुणे जिल्हा मेळावा रांजणगाव गणपती येथे आयोजित करण्यात आला होता.
रांजणगाव गणपती येथे हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये नेत्र दीपक सोहळा प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या भजनाने सुरुवात झाली.
गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन,दीप प्रज्वलन व आरती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी प्रदेश अध्यक्ष सुरेश नानासाहेब नाशिककर,शिरूरचे माजी आमदार अशोक पवार,महाराष्ट्र प्रदेशचे युवा अध्यक्ष संतोष भालेकर,महाराष्ट्र प्रदेशचे लॉन्ड्री अध्यक्ष गोविंदराव राऊत,महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव वाघमारे,शिरूर तालुक्याचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या पत्नी मनीषा कटके, माजी मा जिल्हाध्यक्ष शरद नाना पवार,मा.नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,सुभाष राऊत,कल्पना गायकवाड,सुवर्णा सावर्डे,श्रीरंग मोरे,उमेश पवार,भाऊसाहेब श्रीराम,नवनाथ शेवाळे तसेच सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विकास अभंग,जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष सुभाष दळवी,मनोज नांगरे, अक्षय कदम,राकेश कदम,कचरेश्वर राऊत,दत्तात्रय लक्ष्मण अभंग,सोमनाथ गजानन अभंग,गोविंद अभंग,नवनाथ अभंग,सचिन सोपान अभंग,कुंदन अभंग,अमोल अभंग,बाळासाहेब प्रकाश अभंग,धनंजय अभंग यांचे सहकार्य लाभले.
नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून विकास अभंग,महिला जिल्हा अध्यक्ष संगीता ननावरे,जिल्हा युवक अध्यक्ष अक्षय कदम,जिल्हा तंटामुक्ती अध्यक्ष मनोज नांगरे,जिल्हा लॉन्ड्री अध्यक्ष राकेश कदम यांची नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श माता पुरस्कार व एक समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच शिरूर तालुका अध्यक्ष दत्तात्रेय कुंडलिक शेलार, तालुका महिला अध्यक्ष पूजा प्रवीण शिंदे, तालुका युवा अध्यक्ष काळूराम बबन अभंग,तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ टेंभेकर,लॉन्ड्री तालुका अध्यक्ष अविनाश घोलप,तालुका उपाध्यक्ष अक्षय कैलास अभंग यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख दळवी,मनीषा राऊत,संजय भागवत यांनी केले तर आभार कैलास अभंग यांनी मानले.



