खेड मधील अति. जिल्हा सत्र न्यायालयाकडून खून प्रकरणातील एकास अखेर जामीन मंजूर
पुणे - (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर) महाळुंगे एमआयडी पोलीस स्टेशन मध्ये खून केल्या प्रकरणी गुन्हा रजि नं ४१९/२०२४ दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसानी कारवाई करत सदर गुन्ह्यामध्ये एकूण ८ आरोपीस अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदरचे आरोपी यांना मे.कोर्टाच्या आदेशान्वये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. सदरचा खटला दाखल झाल्यानंतर अनेक वेळा मे. कोर्टाच्या समोर युक्तिवाद करण्यात आला. ८ आरोपी मधील एका आरोपी च्या वतीने त्याची बाजू मांडण्याकरिता ॲड.स्वप्नील सातव, ॲड.मयूर करचे, यांनी युक्तिवाद करत आरोपीची बाजू मांडली. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मे. अति जिल्हा व सत्र न्यायालय खेड राजगुरुनगर यांनी संबंधित प्रकारामध्ये दोन्ही वकिलांच्या बाजू एकूण घेतल्या. तद्नंतर मे.कोर्टात जामीन अर्ज दाखल केला असता मे . कोर्टाने त्यावर आदेश पारित केले. जामिन अर्जाच्या युक्तिवादावेळी सदर आरोपी याचा गुन्ह्यात कोणताही सहभाग दिसून येत नाही तसेच सदर आरोपी यास अटक करतेवेळी भारतीय संविधान मधील अनुच्छेद २२ नुसार आरोपी मानवी अधिकारांचे उल्लंघन केले असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आरोपींच्या वकिलांनी आणून दिले. सदरचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन्ही बाजू समजून घेऊन मे. अति जिल्हा व सत्र न्यायाधीश राजगुरुनगर यांनी सदर आरोपी यास त्वरित जामीन मंजूर केला आहे..!
सदर प्रकरणात ॲड.शुभम कावळे, तुषार तांदळे, ॲड.मृणाल भोईटे, ॲड.तृप्ती पवार यांनी कामकाज पाहिले.
