शिरूर येथे वेदांत मोटर्स च्या मालकावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )
शिरूर येथील वेदांत मोटर्स फर्म या व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी राजेंद्र अशोक बारगुंजे वय वर्ष 49 वर्ष राहणार बाबुराव नगर यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे याबाबत शिरूर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार,
सारिका दीपक बारवकर व दीपक भीमराव बारवकर यांच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली असता प्रत्येक वेळेस पेमेंट पुढील हप्त्यात देतो परंतु पेमेंट काही दिले नाही त्यानंतर बऱ्याच वेळा पैशाची मागणी केली नंतर उडवा उडवीचे उत्तरे अश्लील शिवीगाळ आम्हास केली दिनांक 8/08/2024 रोजी आम्ही दीपक बारवकर व सारिका बारवकर यांचे नावे समजूतीचा कारनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती नोटरी करून 25000 ,25000 व 50000 असे मिळून 100000 माझे खाते वरती पाठवले होते परंतु त्या दोन्ही मुदत दिनांक 10/12/2024 संपून गेल्यानंतरही माझे 1500000 रुपये आजपर्यंत दिले नाही त्यांना पैशाची मागणी केली तर तुझे वरती सावकारकीचा गुन्हा दाखल करून तुला जेलची हवा खाण्यास पाठवितो अशी धमकी देत आहे आज रोजी पर्यंत मला माझी रक्कम परत मिळाली नसून मला उडवा उडवीचे उत्तरे देऊन माझी विश्वासघाताने आर्थिक फसवणूक केली आहे तरी दिनांक 04/10/2023 रोजी पासून ते आज रोजी पर्यंत दीपक भिमराव बारवकर व सारिका दीपक बारवकर यांनी त्यांचे नावे असलेली फर्म वेदांत मोटर्सच्या अकाउंटवर 15 लाख रुपयाची रक्कम घेऊन त्या रकमेची मागणी केली असता मला शिवीगाळ दमदाटी करून माझे वर सावकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असून दीपक बारवकर व सारिका पारवकर यांनी माझी विश्वासघाताने आर्थिक फसवणूक केली असून याबाबत अधिकचा तपास अंमलदार टेंगले हे पो. नि.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत
