गोलेगावच्या सुमेधा वाखारे हिची यशाला गवसनी, न्याय दंडाधिकारी पदावर नियुक्ती!

Dhak Lekhanicha
0

 गोलेगावच्या सुमेधा वाखारे हिची यशाला गवसनी, न्याय दंडाधिकारी पदावर नियुक्ती!


शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )

   शिरूर शहरातील शेतकरी कुटुंबातील तरुणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या न्यायाधीश परीक्षेत सुमेधा बाजीराव वाखारे उत्तीर्ण होऊन तिने दिवाणी न्यायाधीश 'क' स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाला गवसणी घातली आहे. वडील दिवाणी वकील बाजीराव वाखारे व आई सुनीता वाखारे यांच्या कष्टाचे चीज केले आहे.

       शिरूर शहरातली तरुणीने जिद्द, चिकाटी सातत्य आणि अथक अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या यशामुळे सर्व स्तरांतून तिचे शिरूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे. 


     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दिवाणी न्यायाधीश परीक्षेत २०२२ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यात शिरूर राममाळी येथील वकील बाजीराव वाखारे यांची कन्या सुमेधा वाखारे हिने घवघवीत यश मिळवून न्यायाधीश पदाला गवसनी घातली आहे.

       सुमेधा वाखारे यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिरूर येथे झाले. पदवीचे शिक्षण पुणे येथील बी. एम. सी. सी. महाविद्यालयातून पूर्ण केले. यानंतर न्यायदानाच्या क्षेत्रात करिअर करायचे ठरविल्याने आय. एल. सी.महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.


        वडील बाजीराव वाखारे प्रसिद्ध दिवाणी वकील असल्याने याच क्षेत्रात करिअर करायचे परंतु न्यायाधीश व्हायची इच्छा सुमेधाने मनाशी बाळगली.

         न्यायाधीश होण्याचे ठरवलेल्या ध्येयासाठी अभ्यासाला सुरुवात केली. २०२१ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी स्तर न्यायाधीश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली होती. मुलाखतीअभावी संधी मिळाली नाही. 

        याने खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास करून २०२२ च्या झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सुमेधा हिची निवड झाली. वडील बाजीराव हरिभाऊ वाखारे हे शेतीबरोबरच दिवाणी वकील म्हणून काम करतात. यामुळे दिवाणी न्यायाधीश होण्याचे बाळकडू आणि प्रेरणा घरातून मिळाली. आई सुनीता वाखारे या गृहिणी असून, मुलीच्या शिक्षणाविषयी त्यांना प्रचंड तळमळ होती. मुलगी न्यायाधीश झाल्याने वाखारे परिवारच्या आनंदाला उधाण आले.जयवंत वाखारे, बाजीराव वाखारे, लहानू वाखारे या एकत्रित कुटुंबातील सुमेधा हिने मिळवलेले याच्याबद्दल शिरूर तालुक्यातून व शिरूर शहरातून तिचे अभिनंदन होत आहे. 

     शिरूर वकील संघटनेचे अध्यक्ष अमित खेडकर, माजी अध्यक्ष किरण आंबेकर, प्रदीप बारवकर, रवींद्र खांडरे, सतीश गवारी संजय ढमढेरे, यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

  न्यायदानाच्या क्षेत्रात काम करायचे हे पक्के होते. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. अपयशाने मला यशाची पायरी गाठण्यासाठी खूप प्रेरणा दिली. अभ्यासातील सातत्य आणि आई वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ध्येय साध्य झाल्याने आनंद आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!