शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!गहाळ झालेले ३५ मोबाईल फोनचा शोध लाऊन मुळ मालकांच्या दिले ताब्यात
शिरूर प्रतिनिधी :- सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )
२०२४ ते एप्रिल २०२५ मध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्टॅण्ड व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अनेक अर्ज दाखल झालेले होते. सदरचे गहाळ झालेले मोबाईल फोन हे तांत्रीक विश्लेषनादावारे शोध घेवुन पुन्हा नागरिकांना परत करण्यात आले.
शिरूर पोलीस स्टेशन येथुन मिळालेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ झालेले मोबाईल पोलीस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी ट्रेसिंग लावुन गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत तांत्रीक विश्लेषन करण्याचे काम सुरू केले होते.
सन २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीमधील गहाळ झालेल्या मोबाईल फोन पैकी तब्बल ६,८६,००००/- रूपये किंमतीचे एकुण ३५ मोबाईल फोन तांत्रीक विश्लेषनाद्वारे परराज्यामधुन व परजिल्हयामधुन शोध घेवुन परत मिळवण्यात यश मिळाले आहे. सदरचे शोधुन काढण्यात आलेले मोबाईल हे आज दिनांक २१/०४/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे हस्ते मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. बहुतांश नागरिक हे एकदा हाळ झालेल्या मोबाईल फोन परत मिळण्याची आशा सोडुन देतात परंतु मुळ मालकांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे व गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले असुन नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी म प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक नी. संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस अमंलदार विजय शिंदे यांनी केली आहे.
