शिंदोडी येथून विवाहिता व मुलगा बेपत्ता!
शिंदोडी प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिंदोडी तालुका शिरूर येथून विवाहिता तिच्या सहा वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले असून पती गणेश बबन सावंत 28 वर्ष यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार गणेश बबन सावंत वय 28 वर्षे व्यवसाय मजुरी सध्या राहणार शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ रा लिंगी पिंपळगाव तालुका वाशी, जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी असून शिंदोडी येथे मोलमजुरी करत होते.पत्नी वैशाली व मुलगा विराज वय 6वर्ष हे घरात काहीही न सांगता निघून गेले असून,
अंगात हिरव्या रंगाची साडी त्यावर पांढरी नक्षी तसेच त्यावर काळे जाकीट, केस लांब काळे, कानात फुल, गळयात मंगळसुत्र, कपाळावर गोंदलेले, पायात जोडवे चांदीचे पैंजण, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल व मराठी भाषा बोलते.
विराज गणेश सावंत वय-६ वर्षे शिक्षण-१ ली, रंग-सावळा, उंची ३ फुट, अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट, डोकीस काळे केस, पायात काळया रंगाचे सँडल व मराठी भाषा बोलतो.
२८/०४/२०२५ रोजी २१:०० ते दिनांक २९/०४/२०२५ रोजी ००:३५ वा चे दरम्यान मौजे शिंदोडी ता. शिरूर जि.पुणे येथुन रहाते घरातुन माझी पत्नी व मुलगा असे दोघे कोणास काहीएक न सांगता निघुन गेले आहेत. याबाबत अधिकचा तपास पोलीस हवालदार खेडकर व हवालदार टेंगले हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
.jpg)