सभेला झालेली गर्दी पाहून महावितरणच्या माध्यमातून वीज घालून वेठीस धरण्याचं काम विरोधक करत आहेत - शेखर
पाचुंदकर
शिरूर आंबेगाव : मंचर येथील सभेला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणून विजेच्या माध्यमातून सणासुदीला आमच्या लोकांवर सूड उगवायचा प्रयत्न होतोय. तसेच शेतकऱ्यांचे शेतीच्या उत्पन्नावर पवार साहेबांमुळे भरभराट झाल्याने विजेच्या व महावितरणच्या माध्यमातून वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी केला आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा प्रचार दौरा सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. गणेगाव येथील पद्मावती वस्ती येथे पाचुंदकर बोलत होते की, 'गणेगाव दुमाला येथे विजेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मंचर येथील २८ तारखेच्या सभेनंतर काही ठिकाणीं जाणून बुजून वीज खंडित केली जात आहे असा आम्हाला संशय आहे. तसेच दिवाळी हा सणसुद असताना सुद्धा वर्षाचा दिवाळीचा सण हा अंधारात गेला आहे. जे कर्मचारी आणि अधिकारी कालपर्यंत आमच्या मागणीला योग्य उत्तर देत होते ते आज फोन आमचा उचलत नाही. फक्त त्या सभेला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणून विजेच्या माध्यमातून सणासुदीला आमच्या लोकांवर सूड उगवायचा प्रयत्न होतोय का ?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुढे पाचुंदकर यांनी सांगितले की, 'निवडणुकीचे १५ दिवस निघून जातील, मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. बिबट्याच्या संदर्भात उपायोजना, दिवसा विजेसाठी उपाययोजना कराव्या लागतील. परंतु या भागातील तसेच शेतकऱ्यांचे शेतीच्या उत्पन्नावर पवार साहेबांमुळे भरभराट पवार साहेबांमुळे झालेली आहे. या शेतकऱ्यांना विजेच्या व महावितरणच्या माध्यमातून वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा' तीव्र शब्दांत पाचुंदकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील रांजणगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा प्रचार दौरा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ४२ गावांमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी शेखर पाचुंदकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकर जांभळकर आणि टाकळी हाजी माजी सरपंच दामू घोडे या तिघांनी खांद्यावर घेतल्याने निकम यांची चांगली ताकद वाढली आहे.
