शिरूर हवेली मतदारसंघात अशोक पर्व संपून,माऊली पर्व सुरू!
माऊली आबा कटके यांचा दणदणीत विजय !
शिरूर (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)-
शिरूर हवेली मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यामध्ये सरळ लढत होती.
तशीही लढत अगदी चुरशीची व कांटे की लढत म्हणून या कडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते.
यावेळी अशोक पवार यांना एकूण 117,731 मते पडली तर माऊली आबा कटके यांना 192,281 मते पडली.
शिरूर हवेली मतदार संघातील सर्व रेकॉर्ड मोडत भल्या भल्यांचे भाकीते खोटे ठरवून माऊली आबा कटके हे 74,550 मतांनी दणदणीत विजय मिळवत अशोक पवार यांचा दारुण पराभव करून इतिहास रचला.
अशोक पवार यांच्यासारख्या राजकारणात मुरब्बी असणाऱ्या उमेदवाराला पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी मिळाली नाही.
अशोक पवार यांचे एकीकडे खंदे समर्थक असलेले विश्वासू सहकारी त्यांना सोडून गेले. तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा बंद पडल्यामुळे त्याचा रोज सुद्धा पूर्व भागातील मतदारांनी मतदानातून दाखवून दिला.
शिरूर शहरातून सुद्धा अशोक पवारांना मताधिक्य मिळाले नाही. माऊली आबा कटके यांना उज्जैन महाकाल यात्रा पावल्याचे सगळीकडे बोलले जात आहे.
आज निवडणुकीचा निकाल व काळभैरव जयंती हा योगायोगच म्हणावा लागेल.
माऊली आबा कटके विजय होताच संपूर्ण शिरूर शहरामध्ये गुलालाची उधळण फटाक्यांचे आतिषबाजी सुरू करण्यात आली. शिरूर शहरातील प्रत्येक चौकामध्ये गुलालाची उधळण करण्यात आली व फटाके वाजवण्यात आले.
यावेळी विजयी उमेदवार माऊली कटके हे प्रथम प्रभू रामलिंग महाराजांच्या दर्शनाला तेथून ते मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात पुढे अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच लोकनेते माजी आमदार कै.बाबुराव पाचर्णे यांच्या शक्री स्थळाला जाऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, बाबासाहेब फराटे, सुधीर फराटे,माजी उपसभापती पंचायत समिती राजेंद्र जासूद,शिरूर तालुका अध्यक्ष रवी काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर शहराध्यक्ष शरद कालेवार, अनुसूचित जाती जमाती भाजप जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव,शिरूर शहराध्यक्ष मयूर थोरात,माजी उपनगराध्यक्ष जाकिर पठाण, रंजन झांबरे,निलेश जाधव, एजाज बागवान यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
