शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र!

Dhak Lekhanicha
0

 शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र!


 घोडगंगा सहकारी साखर कारखाना चेअरमन ऋषीराज पवार यांना विवस्त्र  करून मारहाण व खंडणी उकळण्याचा प्रयत्न!


 शिरूर प्रतिनिधी :


शिरुर हवेली मतदारसंघात शरद पवार गटाचे अशोक पवार आणि अजित पवार गटाचे माउली कटके यांच्यामध्ये लढत होत आहे. दोघांचे जोरदार प्रचार सुरू आहेत. त्यात ही घटना घडली आहे. ऋषिराज हा निवडणुकीचा प्रचारात व्यस्त आहे. एक कार्यकर्ता भाऊ कोळपे आणि ऋषीराज पवार एका ठिकाणी मिटिंगला गेले. त्याठिकाणी ऋषिराजला विवस्त्र केले आणि त्या ठिकाणी एका बाईला विवस्त्र करून दोघांचे फोटो काढले. त्यानंतर दहा कोटी रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ऋषिराज याने माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. म्हणून तो बाहेर गेला. ऋषिराजने ही माहिती वडिल यांना सांगितले. या संदर्भात तक्रार करण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनला गेले परंतु तक्रार नोंदविण्यात आली नसल्याची माहिती ॲड.असिम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाऊ कोळपे हा पवार यांच्याविरोधात होता. परंतु आता पवारांबरोबर आला. मांडवगण येथे जाण्यासाठी तो ऋषिराज यांच्यामागे माझ्या तीन चार दिवस जाण्यासाठी मागे लागला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून ऋषिराज पवार हा त्यांच्याबरोबर प्रचारासाठी गेला. त्याच्याबरोबर मोटारसायकलवरून गेल्यानंतर ऋषिराज याला एका रुममध्ये मारहाण करून डांबून ठेवले. त्यांनी माझ्या तोंडावर कापड टाकून, माझा गळा दाबला, मला जीवे मारण्याचा प्रत्न केला. एकाने एक महिला आणली. तिच्याबरोबर विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपये खंडणी मागितली. मी त्यांच्याशी गोड बोलून, व्हिडिओ, फोटो तुमच्याकडे ठेवा, पैसे घेऊन येतो. मी बाहेर जावून मित्राला बोलवून घेतले. त्यातील एकाला पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे, याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी ऋषिराज पवार यांनी केली आहे. 

याप्रकरणी अशोक पवार यांनी प्रतिक्रिया देताना निंदनीय राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. एखाद्याचे जीवन बरबाद करण्याचे काम सुरू आहे. अशा पद्धतीने राजकारण होत असेल, तर हा दुर्देवी प्रकार आहे. तीन आरोपी पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. याच्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे अशोक पवार यांनी म्हटले आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!