No title

Dhak Lekhanicha
0

 विद्याधाम प्रशालेचा संस्कार येलभर याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड!


शिरुर : (प्रतिनिधी सुदर्शन दरेकर)-

 तालुक्यातील मोटेवाडी येथील येलभर घराण्याचा पैलवानकीचा वारसा संस्कार येलभर याने जोपासताना महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय पातळीवर गरुड झेप घेतली आहे .

       क्रीडा व युवक संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे व बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते .

      विद्याधाम प्रशाला व विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालय शिरूर येथे इयत्ता ११ वीत शिकणारा खेळाडू पै .संस्कार येलभर याने ९७ किलो वजनगटात ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात प्रतिस्पर्धी मल्लांना आसमान दाखवत सुवर्णपदक पटकावले .या यशामुळे संस्कारची उत्तर प्रदेशातील मेरठ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून तो राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे .

   संस्कार येलभर याच्या घराण्यात पैलवानकीचा जुना वारसा आहे .येलभर घराण्यातील वस्ताद कै .गेणुभाऊ दादा येलभर यांनी परिसरात कुस्ती वाढवली तर कै . संतोष आण्णा येलभर यांनी महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला .प्रा .सचिन येलभर हे उपमहाराष्ट्र केसरी झाले . तर ओंकार येलभर हे शिरूर केसरी झाले .

      आजोबा बाळासाहेब येलभर ,आजी लता येलभर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी लहान वयातच वडील निलेश येलभर ,आई रिना येलभर यांनी मुलावर कुस्तीचे 'संस्कार 'व्हावेत म्हणून योग्य खबरदारी घेतली .कोच रमन राठी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार कुस्तीचे डावपेच आत्मसाथ करत आहे . आपल्या घराण्याचा वसा व वारसा संस्कारने जोपासत तो पुढे चालु ठेवला आहे . संस्कारला सर्व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे . 

    या यशाबद्दल संस्कारचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा , सचिव नंदकुमार निकम , शाळा समितीचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर , सर्व संस्था पदाधिकारी ,प्राचार्य गुरुदत्त पाचर्णे ,माजी प्राचार्य संजय शेळके सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी खेळाडू व पालकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!