गौरी शुगर कडून सभासदांची दिवाळी गोड! सभासदांना मोफत साखर वाटप!

Dhak Lekhanicha
0

 गौरी शुगर कडून सभासदांची दिवाळी गोड! सभासदांना मोफत साखर वाटप!


मांडवगण फराटा (ता. शिरूर) प्रतिनिधी राजू कांबळे 

सोमवार दि.२१ रोजी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उसगाळपा  साठी अडचणीच्या क्षणी सहकार्याचा हात देणारा श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा.लि. युनिट ४ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी केली गोड. 

      शिरूर तालुक्याचे वैभव असणारा सभासदांचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना दोन वर्षे बंद आहे. या भागात लाखो टन ऊसाचे उत्पादन होते.शेतकऱ्यांना आपला ऊस नेतील त्या दरात देणे भाग पडत होते.अशा अडचणीच्या वेळी गौरी शुगर प्रा.लि .या साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी ऊस नेण्यासाठी सर्वोतापरी सहकार्य केले. शिवाय महाराष्ट्रात सर्वात प्रथम उच्चांकी ३००६ रुपये प्रति टन ऊसाला बाजारभाव जाहीर केला.यामुळे सन २०२३-२४ या वर्षात ८ लाख टना पेक्षा जास्त ऊस गाळप केले.शेतकऱ्यांना ऊसाचे बिल एकरकमी दिले शिवाय टनेज नुसार मोफत साखर देखील वाटप केली.आजपर्यंत फक्त सभासदांना साखर मिळते असे तेही ठराविक रक्कम देऊन परंतु बिगर सभासद शेतकऱ्यांना साखर देणारा व तेही मोफत महाराष्ट्रातील एकमेव गौरी शुगर कारखाना ठरला आहे.

       टनेज नुसार ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे मोफत साखर मिळणार आहे.१ ते १० टन १० किलो,३१ ते ५० टन २० किलो,५१ ते १०० टन ३० किलो,१०१ ते १५० टन ४० किलो,१५१ ते २०० टन ५० किलो,२०१ ते ३०० टन ७० किलो,३०० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० किलो मोफ़त साखर मिळणार आहे.

       यावेळी मा.पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे म्हणाले शेतकऱ्यांना राजकारणाचे काही देणे घेणे नाही त्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव तोही एकरकमी मिळाला यापेक्षा अजून काय पाहिजे.

 "शेतकऱ्यांना ऊसगाळपासाठी सहकार्य व्हावे म्हणून या भागातील ऊस गौरी शुगरला नेऊन योग्य बाजारभाव देत त्यांना दिवाळी साठी मोफत साखर देण्याचे ठरवले असून त्याची सुरुवात आजपासून १० दिवस सुरू राहणार आहे.सर्वांचे आभार मानतो"

                     बाबुराव बोत्रे चेअरमन गौरी शुगर प्रा.ली 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!